राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती; अंतर्गत सुरक्षेची दिली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 06:29 IST2019-10-30T01:06:55+5:302019-10-30T06:29:04+5:30
पडसलगीकर हे आयबीमध्ये कार्यरत होते

राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती; अंतर्गत सुरक्षेची दिली जबाबदारी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर जाणारे पडसलगीकर हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस अधिकारी आहेत.
पडसलगीकर हे आयबीमध्ये कार्यरत होते. तेथून ते मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणूनही काम पाहत होते. निवृत्तीनंतर राज्य सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती.अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तर पडसलगीकर हे आता उपसल्लागार म्हणून काम पाहतील. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असेल.