धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:33 AM2018-11-21T03:33:38+5:302018-11-21T03:33:52+5:30

शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरात दोन आठवड्यांपासून धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. अंधेरीसह आता माझगावमध्येही धूलिकणांचे प्रमाण वाढले असून, धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

 Dust crosses danger level; Mazagaon is the most polluted | धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित

धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली; माझगाव सर्वाधिक प्रदूषित

Next

मुंबई : शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरात दोन आठवड्यांपासून धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. अंधेरीसह आता माझगावमध्येही धूलिकणांचे प्रमाण वाढले असून, धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सीस्टिम आॅफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरून माझगाव येथे धूलिकणांचे प्रमाण ४११ पीएम नोंदविण्यात आले. हे प्रमाण वाढल्याने हवेची गुणवत्ता खालावली असून, हवेचा दर्जा चिंताजनक असल्याचे सफरवर नोंदविण्यात आले.
आॅक्टोबर महिन्यांपासून धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याचे नोंद करण्यात येत आहे. मागील दोन आठवड्यापासून अंधेरी, बोरीवली, मालाड, माझगाव या भागातील हवेचा दर्जा खालवल्याचे नोंदविण्यात येत आहे. आता माझगाव भागातील हवेचा दर्जा चिंताजनक असल्याने येथील हवा प्रदूषित झाली आहे. संपूर्ण मुंबईतील हवेची गुणवत्ता २१२ एक्यूआय असल्याचे सफरने नोंदविले आहे.
फटाके वाजविल्याने, वाहतूक, विकासात्मक प्रकल्प, वाढते बांधकाम, यामुळे धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर/ पीएम) प्रमाण वाढत आहे. मंगळवारी, अंधेरी, मालाड, बोरीवली या भागात धूलिकणांचे प्रमाण जास्त होते. मंगळवारी अंधेरीत धूलिकणांचे प्रमाण ३५६, मालाडमध्ये ३१९ आणि बोरीवलीत २१० पीएम नोंदविण्यात आले असून, हवेची गुणवत्ता अत्यंत खालावल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, चेंबूर, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, कुलाबा, नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता सामान्य असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

मंगळवारी नोंद केलेली हवेची गुणवत्ता, निर्देशांक
माझगाव ४११
अंधेरी ३५६
मालाड ३१९
बोरीवली २१०
वांद्रे-कुर्ला संकुल १९४
वरळी १५४
भांडुप १५४
कुलाबा १३१
चेंबूर १००
नवी मुंंबई ९५
(वातावरणातील कणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटरमध्ये, स्रोत : सफर)

Web Title:  Dust crosses danger level; Mazagaon is the most polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई