Join us

आमदारांना दसऱ्याची भेट, निधी आता चार कोटींचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 07:57 IST

Maharashtra Government: राज्यातील प्रत्येक आमदाराला आता चार कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी दरवर्षी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. गुरुवारी यासंदर्भातील आदेश काढण्यात आला. 

मुंबई : राज्यातील प्रत्येक आमदाराला आता चार कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी दरवर्षी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. गुरुवारी यासंदर्भातील आदेश काढण्यात आला. २०११-१२ पासून आमदार निधी दोन कोटी रुपये देण्यात येत होता. तो तीन कोटी करताना भविष्यात त्यात आणखी वाढ केली जाईल, असे पवार यांनी गेल्या अधिवेशनात जाहीर केले होते. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला निधी चार कोटी रुपये इतका करून आमदारांना दसरा भेट देण्यात आली. विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ६२ अशा एकूण ३५० आमदारांना ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व आमदारांना मिळून आता दरवर्षी एकूण १४०० कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळणार आहे. विकास कामांना जादा निधी देणारविकास कामांवरील खर्चांबाबत आतापर्यंत असलेले निर्बंध वित्त विभागाने एका आदेशाद्वारे गुरुवारी शिथिल केले. त्यानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत ७५ टक्के निधी बांधिल खर्चासाठी (आस्थापना खर्च) वितरित करण्याची अनुमती देण्यात आली आहे. कार्यक्रम खर्चासाठी ५० टक्के इतक्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रआमदार