Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंग्ज सर्कल येथे डंपरची एसटीला धडक, सायन परिसरात वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 18:50 IST

या अपघातामुळे तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली होती.

ठळक मुद्देदुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ओमकार गावंड

मुंबई : सायन जवळील किंग्ज सर्कल येथील रेल्वे उड्डाणपुलाखाली बुधवारी दुपारी डंपरने एसटीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातामुळे सायन परिसरात दादरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. भरधाव वेगात असणाऱ्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर थेट एसटीवर मागच्या बाजूने आदळला.

 

 

सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले व दोन्ही वाहनांना बाजूला केले. यानंतर या मार्गावरून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली होती.

 

टॅग्स :अपघातपोलिसमुंबईवाहतूक कोंडी