पावसामुळे पार्ल्यात कोसळले मोठे झाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 21:12 IST2019-07-08T21:09:35+5:302019-07-08T21:12:15+5:30
या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

पावसामुळे पार्ल्यात कोसळले मोठे झाड
ठळक मुद्देमाहिती पालिकेच्या आपत्कालीन पथक, फायर ब्रिगेडला देऊन ताबडतोब बोलवण्यात आले. आज सकाळी 11 वाजता अतिवृष्टीमुळे मोठे झाड एका गाडीवर पडले.
मुंबई - विलेपार्ले पूर्व मालविया रोड येथे आज सकाळी 11 वाजता अतिवृष्टीमुळे मोठे झाड एका गाडीवर पडले. या घटनेबाबत कळताच शिवसेना शाखा क्रमांक ८५ येथील शिवसैनिक ताबडतोब घटनास्थळी पोहचून त्यांनी गाडीत अडकलेल्या ड्राईव्हरला काच फोडून बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. माहिती पालिकेच्या आपत्कालीन पथक, फायर ब्रिगेडला देऊन ताबडतोब बोलवण्यात आले.
त्याक्षणी शिवसेना विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, उपविभाग प्रमुख चंद्रकांत पवार, शाखाप्रमुख अनिल मालप, माजी शाखा प्रमुख दशरथ साबळे,युवा शाखा अधिकारी सिद्धेश पवार, कार्यालय प्रमुख जगन्नाथ मालपेकर, गटप्रमुख अनिल सोरटे व शिवसैनिक मदतकार्यात उपस्थित होते.