लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या टोळीशी निगडित असलेल्या फैजल जावेद शेख व अलफिया फैजल शेख या दोघांनी अमलीपदार्थांच्या व्यवहारातून निर्माण केलेल्या मालमत्तेच्या शोधासाठी ईडीने मुंबईत बुधवारी केलेल्या छापेमारीत १०० कोटींच्या बेनामी व्यवहारांची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी ४२ लाखांची रोख, ३ सेकंड हँड आलिशान गाड्या, मालमत्तांची कागदपत्रे, बँक लॉकरची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून या दोघांनी अमलीपदार्थ विक्रीतून अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांचा शोध आता ईडीने सुरू केला आहे. कुख्यात अमलीपदार्थ तस्कर सलिम डोला याच्या माध्यमातून हे दोघे जण हा व्यवसाय करत होते. अमलीपदार्थ विक्री प्रकरणात डोला याचा शोध सुरू असून, त्याची माहिती देणाऱ्यास एनसीबीने बक्षीसही जाहीर केले. दाऊदच्या टोळीशी संबंधित असलेल्या फैजल याला २०२३ मध्ये एनसीबीने अटक केली असून, त्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवले होते. मात्र, तेथून तो सक्रिय होऊ नये यासाठी त्याला चेन्नई कारागृहात हलविण्यात आले आहे.
Web Summary : ED raids on Dawood Ibrahim's associates, Faisal and Alfiya Sheikh, uncovered ₹100 crore in drug money. Authorities seized cash, luxury cars, property papers, and digital devices. The duo allegedly operated through drug trafficker Salim Dola.
Web Summary : दाऊद इब्राहिम के सहयोगियों, फैसल और अल्फिया शेख पर ईडी के छापे में ₹100 करोड़ की ड्रग मनी का खुलासा हुआ। अधिकारियों ने नकदी, लग्जरी कारें, संपत्ति के कागजात और डिजिटल उपकरण जब्त किए। दोनों कथित तौर पर ड्रग तस्कर सलीम डोला के माध्यम से काम करते थे।