चालक मोबाइलवर बोलतोय; फोटो पाठवा, कारवाई होणार; एसटी महामंडळाचे सुरक्षेसाठी पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:04 PM2023-11-16T12:04:34+5:302023-11-16T12:04:46+5:30

एसटी महामंडळाचे सुरक्षेसाठी पाऊल; चालकांना वरिष्ठांकडून सूचना

Driver talking on mobile; Send photo, action will be taken | चालक मोबाइलवर बोलतोय; फोटो पाठवा, कारवाई होणार; एसटी महामंडळाचे सुरक्षेसाठी पाऊल

चालक मोबाइलवर बोलतोय; फोटो पाठवा, कारवाई होणार; एसटी महामंडळाचे सुरक्षेसाठी पाऊल

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीकडून कायमच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. याचाच एक भाग म्हणजे चालक मोबाइलवर बोलत वाहन चालवित असेल, तर अपघात घडत असतात, असा निष्कर्ष अनेक घटनांवरून समोर आला आहे. सुरक्षेला कोठेही धक्का लागू नये, म्हणून एसटी महामंडळाकडून चालकांना वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळले, तर कारवाई करण्यात येणार आहे. चालकांना वरिष्ठ कार्यालयाकडून सूचनाही आल्या आहेत.  प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.

भरारी पथक ठेवणार बोलणाऱ्या चालकांवर नजर
मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांवर वचक ठेवण्यासाठी भरारी पथक लक्ष ठेवून असणार आहे. त्याचबरोबर, संबंधित वाहनातून प्रवास करणारे प्रवासीही मोबाइलवर बोलत एसटी चालविणाऱ्या चालकाचा फोटो किंवा व्हिडीओ काढून वरिष्ठांना पाठवू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या एसटी चालकांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.

मोबाइलवर बोलत असताना वाहन चालविणे गुन्हा आहे; पण अनेक जण ब्लूटुथ हेडफोन वापरत असतात. अशा वाहकांवरही कारवाई होण्याची गरज आहे. - वैभव तनपुरे, प्रवासी.

Web Title: Driver talking on mobile; Send photo, action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.