डीजीपीआरच्या महासंचालकपदी डॉ.पांढरपट्टे रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 05:50 IST2020-01-23T05:49:27+5:302020-01-23T05:50:00+5:30

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.

Dr. Dilip Pandharpatte appointed as Director General of DGPR | डीजीपीआरच्या महासंचालकपदी डॉ.पांढरपट्टे रुजू

डीजीपीआरच्या महासंचालकपदी डॉ.पांढरपट्टे रुजू

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. ते प्रथितयश लेखक आणि कवी आहेत. सनदी अधिकारी म्हणून निवासी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसचिव आदी पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.

निधी चौधरी रायगडच्या नव्या जिल्हाधिकारी
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपसचिव निधी चौधरी यांची रायगडच्या जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. डॉ. नरेश गिते यांची चौधरी यांच्या जागी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात बदली करण्यात आली. गिते हे आधी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

Web Title: Dr. Dilip Pandharpatte appointed as Director General of DGPR