मुंबई- मुंबईतल्या सांताक्रूझ परिसरात बेस्टच्या डबलडेकरला अपघात झालाय. या अपघातात डबलडेकर बस रेलिंग धडकल्यानं बसच्या वरचा पत्रा निखळला आहे. बेस्ट प्रशासनाची ही डबलडेकर बस वांद्र्यातून मुंबई विद्यापीठाच्या दिशेनं जात असताना अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
मुंबईतल्या कलिना येथे डबल डेकर रेलिंगला धडकून अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 12:16 IST