सीबीएसई, आयसीएसई शाळांसाठी दुपटीने अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:35 AM2021-03-30T03:35:40+5:302021-03-30T03:36:22+5:30

मुंबई महापालिका शाळांतील झपाट्याने घटणारी विद्यर्थीसंख्या आणि शहरातील इंग्रजी शाळांकडे पालकांचा वाढता कल लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने स्वतःच्या सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Double application for CBSE, ICSE schools | सीबीएसई, आयसीएसई शाळांसाठी दुपटीने अर्ज

सीबीएसई, आयसीएसई शाळांसाठी दुपटीने अर्ज

Next

मुंबई :  मुंबई महापालिका शाळांतील झपाट्याने घटणारी विद्यर्थीसंख्या आणि शहरातील इंग्रजी शाळांकडे पालकांचा वाढता कल लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने स्वतःच्या सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या मुंबई पब्लिक स्कूल या सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांना विद्यार्थी, पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

यंदा नर्सरी ते सहावीच्या एकूण ३,७६० जागांसाठी तब्बल ९,५२४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. ऑनलाइन अर्जांची मुदत २४ मार्च रोजी संपली असून, आता छाननी प्रक्रिया सुरू आहे. लवकरच प्रवेशाची सोडत महापालिका शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पालिका शिक्षण विभागाने दिली.

अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर सीबीएसई शाळांमधील ९० टक्के प्रवेश लॉटरी पद्धतीने तर पाच टक्के महापौरांच्या शिफारसीनुसार आणि पाच टक्के जागा महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव असतील. या प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल. काही शाळांमध्ये उपलब्ध जागांपेक्षा अर्ज कमी आल्याने अशा ठिकाणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या सूत्रानुसार जागा देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पालिकेच्या सीबीएसई मंडळाच्या शाळांना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता सीबीएसई बोर्डाच्या आणखी दहा शाळा २०२१-२२ पासून सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.  

१२ शाळांतील वर्गनिहाय प्रवेशक्षमता व आलेले अर्ज
नर्सरी     ७१५- ४८०
ज्युनिअर केजी     २५२३- ४८०
सिनिअर केजी      १४२१- ४००
पहिली     १७१६- ४००
दुसरी      ८४४- ४००
तिसरी     ७१०-४००
चौथी      ६२३- ४००
पाचवी      ५७६- ४००
सहावी      ३९५- ४००

Web Title: Double application for CBSE, ICSE schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.