ऑफलाइन नको, परीक्षा ऑनलाइनच हवी!, दहावी, बारावीच्या विद्यार्थी, पालकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:25 AM2021-04-03T08:25:31+5:302021-04-03T08:25:56+5:30

मुंबई : वर्षभर ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ऑफलाइन परीक्षेचा शिक्षण विभागाचा अट्टाहास का, असा सवाल ...

Don't go offline, exams should be online only !, 10th, 12th class students, parents demand | ऑफलाइन नको, परीक्षा ऑनलाइनच हवी!, दहावी, बारावीच्या विद्यार्थी, पालकांची मागणी

ऑफलाइन नको, परीक्षा ऑनलाइनच हवी!, दहावी, बारावीच्या विद्यार्थी, पालकांची मागणी

Next

मुंबई : वर्षभर ऑनलाइन शिक्षण घेतल्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ऑफलाइन परीक्षेचा शिक्षण विभागाचा अट्टाहास का, असा सवाल उपस्थित करत  ५०० ते ६०० विद्यार्थ्यांसह पालकांनी शुक्रवारी शिवसेना भवनवर मोर्चा काढला.  त्यांना पोलिसांनी शिवाजी पार्क  येथेच अडविण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान, पाेलिसांनी बळाचा वापर केल्याने अनेक विद्यार्थी, पालक  तेथून घरी परतले तर काही  तिथेच ठिय्या मांडून बसले. त्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी केली.
राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीच्या ऑफलाइन लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे तर बारावीच्या २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑफलाइन परीक्षा घेऊन शिक्षण विभाग मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप पालकांनी केला. वर्षभर ऑनलाइन अभ्यास करताना ग्रामीण भाग, वाडे वस्ती येथे इंटरनेट सुविधा नव्हती, तेथील विद्यार्थी अभ्यास कसा करत असतील याचा विचार शिक्षण विभागाने केला नाही, मग परीक्षेवेळी त्यांना कनेक्टिव्हिटीची समस्या का आठवली? असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले. 
दरम्यान, शिवसेना भवनावर मोर्चाची माहिती मिळताच पोलिसांकडून काही विद्यार्थी प्रतिनिधींना सकाळीच नजरकैद करण्यात आले आणि संध्याकाळी सोडणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. शिवसेना भवनवर पोहोचण्याधीच काही विद्यार्थी, पालकांना शिवाजी पार्क तर काहींना दादर स्थानकाजवळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली. 

 शिवाजी पार्कवरील पालक, विद्यार्थ्यांच्या जमावाला शिवसेना भवनवर जाण्यापासून रोखण्यासाठी काही विद्यार्थ्यांवर बळाचा वापरही करण्यात आला. त्यामुळे ते निवेदन देण्यासाठी पोहोचू शकले नाहीत. याआधी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान, नागपूर, राज्य शिक्षण मंडळाचे पुणे येथील कार्यालय येथे निषेध व्यक्त केला. अनेक विद्यार्थी व पालक संघटनांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू, देवेंद्र फडणवीस, यांच्या भेटी घेतल्या, मात्र कोणीच दखल घेत नसल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य दांडेकर याने दिली. 

काही प्रमुख मागण्या
nपरीक्षा संमिश्र पद्धतीने आयाेजित कराव्यात.
nउत्तरपत्रिकांची तपासणी विद्यार्थ्यांच्याच शाळा, महाविद्यालयीन स्तरावर करावी.
nपरीक्षेदरम्यान संसर्ग झाल्यास विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी सरकारने स्वीकारावी.
nबारावीसाठी कोणत्याही ५ परीक्षांपैकी ४ विषय सोडविण्याची मुभा द्यावी.
nपरीक्षेदरम्यान दोन विषयांच्या पेपरमध्ये पुरेसे अंतर असावे.
nऑफलाइन परीक्षा झाल्यास ५० गुण परीक्षेला व ५० गुण अंतर्गत मूल्यमापनाला अशी विभागणी करावी. 

Web Title: Don't go offline, exams should be online only !, 10th, 12th class students, parents demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.