Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dolphin in Mumbai: मुंबईकरांना डॉल्फिनचे दर्शन! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:04 IST

मुंबईतील वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन मासे दिसून आले. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात डॉल्फिन पोहताना दिसत आहे. तर त्यांना बघण्यासाठी लोकांची गर्दीही झाली आहे. 

Dolphin Spotted in Mumbai Video: प्रचंड वर्दळ, दिवसभराची धावपळ आणि दगदग झाल्यानंतर वरळी सी फेस थोडा निवांत वेळ घालवण्यासाठी गेलेल्या मुंबईकरांना सुखद धक्का बसला. वरळी सी फेसच्या समुद्रात डॉल्फिनचे दर्शन घडले. एका व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

बऱ्याच वर्षानंतर मुंबईच्या किनाऱ्यापर्यंत डॉल्फिन आलेले दिसले. पाणी स्वच्छ झाल्यामुळे डॉल्फिन किनाऱ्यापर्यंत आले असावेत, असे म्हटले जात आहे. 

इन्स्टाग्रामवरील सेवीन चौहान नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वरळी सी लिंक दिसत आहे. सी फेस जवळ लोक उभे आहेत. ते समुद्रातील पाण्यात होत असलेल्या हालचाली न्याहाळताना दिसत आहे. 

मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन, व्हिडीओ पहा

जो व्हिडीओ शेअर केला गेला आहे, त्यात डॉल्फिनचा छोटा ग्रुप दिसत आहे. पाणी स्वच्छ झाल्याने डॉल्फिन किनाऱ्यापर्यंत आले असून, पोहताना दिसत आहेत. 

कोविडमध्ये दिसले होते डॉल्फिन

यापूर्वी कोविड काळामध्ये मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन दिसले होते. अभिनेत्री जुही चावलासह अनेकांनी व्हिडीओ शेअर केले होते.

एनसीपीएजवळ असलेल्या एका अपार्टमेंटमधून हा व्हिडीओ शूट केला गेला होता. ज्यात डॉल्फिन माशांचा एक ग्रुप समुद्रात पोहताना दिसत होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Delighted: Dolphins Spotted at Worli Sea Face!

Web Summary : Mumbaikars were surprised to spot dolphins at Worli Sea Face. A video shows a group of dolphins swimming near the shore, likely due to cleaner waters. Similar sightings occurred during the Covid lockdown.
टॅग्स :व्हायरल व्हिडिओमुंबईसोशल मीडियासामाजिक