Mumbai Dog Attack Video: रस्त्यावरून चालताना, घराच्या परिसरात फिरताना जर भटका कुत्रा दिसला, तर तुम्हालाही आता भीती वाटेल, अशी घटना मुंबई उपनगरातील गोरेगावमध्ये घडली आहे. शाळेच्या गेटवर असलेल्या एका सुरक्षारक्षकावर भटक्या कुत्र्याने बिबट्यासारखी उडी घेत हल्ला केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त होत असताना गोरेगावमध्ये ही घटना घडली आहे. शाळेच्या परिसरात वावरत असलेल्या या कुत्र्याने अचानकच सुरक्षारक्षकाच्या खांद्याचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला.
गेटजवळ आला, मागे फिरला आणि उडी घेत खांदा पकडला
घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यात सुरक्षारक्षक शाळेच्या गेटजवळ फिरताना दिसत आहे. तिथे एक कुत्राही उभा आहे. दुसरा कुत्रा दूरून गेटजवळ येतो. गेटजवळ काही क्षण उभं राहिल्यानंतर मागे फिरतो. पाठीमागून येत असलेल्या सुरक्षारक्षकाला बघतो आणि जवळ जात उडी मारतो.
उडी मारून कुत्रा थेट सुरक्षारक्षकाचा खांदाच जबड्यात पकडतो. अचानक झालेल्या हल्ल्याने सुरक्षारक्षक घाबरतो. प्रसंगावधान राखत कुत्र्याला खाली ढकलतो. ताकद लावल्यानंतर कुत्र्याच्या जबड्याची पकड सैल होते आणि कुत्रा खाली पडतो. त्यानंतर तो तसाच पुढे चालत जातो.
कोणत्या शाळेत घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर परिसरात असलेल्या आदर्श विद्यालय शाळेत ही घटना घडली. शाळेच्या गेटजवळ भटके कुत्रे असतात, त्यातीलच एका कुत्र्याने हा हल्ला केला. सुरक्षारक्षकावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसरा सुरक्षारक्षक काठी घेऊन आला आणि त्याने चावा घेणाऱ्या कुत्र्याला फटके मारत पळवले.
Web Summary : A stray dog in Goregaon, Mumbai, attacked a security guard at a school gate, leaping and biting his shoulder. The incident, captured on CCTV, highlights growing concerns about stray dog attacks. The guard managed to fend off the dog.
Web Summary : मुंबई के गोरेगांव में एक आवारा कुत्ते ने स्कूल के गेट पर एक सुरक्षा गार्ड पर हमला किया, कूदकर उसके कंधे पर काट लिया। सीसीटीवी में कैद हुई इस घटना ने आवारा कुत्तों के हमलों को लेकर बढ़ती चिंताओं को उजागर किया। गार्ड ने कुत्ते को भगाने में सफलता पाई।