पाणी भरलेल्‍या ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे उघडू नयेत; महापालिकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 07:17 PM2019-06-28T19:17:45+5:302019-06-28T19:17:58+5:30

नागरिकांनी कुठल्‍याही परिस्थितीत मॅनहोल कव्‍हर न उघडण्‍याविषयी आवाहन करणारे फलक विविध ठिकाणी लावण्‍यात आले.

Do not open the cover over the manhole in a water filled area; Municipal Alert | पाणी भरलेल्‍या ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे उघडू नयेत; महापालिकेचा इशारा

पाणी भरलेल्‍या ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे उघडू नयेत; महापालिकेचा इशारा

Next

मुंबई - मुंबई शहर व उपनगरात पावसाचे पाणी भरलेल्‍या ठिकाणच्‍या मॅनहोलवरील झाकणे काढून अपघात होण्‍याची शक्‍यता लक्षात घेता या मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्‍वतःहून काढून टाकू नयेत,  अन्‍यथा महापालिका संबंधित नागरिकांविरुध्‍द कारवाई करेल, असा इशारा महापालिका प्रशासनाने प्रसिध्‍दीपत्रकाव्‍दारे दिला आहे.


पाणी भरलेल्‍या ठिकाणी महापालिका संबंधीत विभागातील कर्मचारी पावसाच्‍या पाण्‍याचा निचरा लवकर व्‍हावा म्‍हणून सदर मॅनहोल उघडे ठेवून व तेथे धोक्‍याची सूचना देणारे फलक लावलेले असतात. मात्र, सन २०१७ च्‍या पावसाळयात लोअर परळ येथील पाण्‍याचा निचरा करणारे मॅनहोल अनधिकृतपणे उघडल्‍याने त्‍यामध्‍ये बॉम्‍बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्‍ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर उघड्या मॅनहोलमध्‍ये पडून मृत्‍युमुखी पडले होते. लोअर परळ येथे २०१७ च्‍या पावसाळ्यात झालेल्‍या दुर्घटनेसाठी दुर्घटनास्‍थळाजवळ राहणारऱ्या चार व्‍यक्‍तींवर आयपीसी सेक्‍शन ३०४ (अ) अंतर्गत कारवाईची प्रक्रीया पोलिसव्‍दारे सुरु आहे. तसेच मॅनहोल दुर्घटनेत महापालिकेचे कर्मचारी जबाबदार नसल्‍याचा निर्वाळाही भोईवाडा न्‍यायालयाने दिला आहे. यासोबतच उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशान्‍वये पाणी भरणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी स्‍वतःहून मॅनहोल उघडू नयेत असे बॅनर बृहन्‍मुंबई महापालिकेच्‍यावतीने ठिकठिकाणी लावण्‍यात आले असून नागरिकांनी अशी मॅनहोल अजि‍बात उघडू नयेत, असे पालिकेने आवाहन केले आहे.


आता दोन वर्षानंतर फि‍तवाला मार्गावरील पर्जन्‍य जल वाहिन्‍यांचे क्षमता वाढविण्‍याचे काम पुर्णत्‍वास नेण्‍यात आलेले असून ‍लोअर परळ आणि प्रभादेवी रेल्‍वे स्‍थानकांच्‍या मध्‍ये असलेल्‍या पर्जन्‍यवाहिनींच्‍या सफाईसाठी मॅनहोल तयार करण्‍यात आले आहे. तसेच फि‍तवाला मार्गाखाली असलेल्‍या बॉक्‍स ड्रेनची क्षमता ही १.६ मीटर बाय १.२ मीटर वरुन २.५ मीटर बाय १.६ मीटर करण्‍यात आली आहे. तसेच सदर पर्जन्‍यवाहिनींच्‍या मार्गातील टेक्‍सटाईल नाल्‍यावरील सुमारे ७० बांधकामे हटवून नाला रुंदीकरण करण्‍यात आलेले आहे. तसेच नाल्‍यात फेकलेल्‍या कचऱयाला अडविण्‍यासाठी जाळी बसविण्‍यात आलेली आहे. त्‍यामुळे या परिसरातील पावसाळी पाण्‍याचा वेगाने निचरा होईल.
तसेच पाणी भरण्‍याची शक्‍यता आहे अशा सखल भागातील मॅनहोलला संरक्षणात्‍मक जाळया बसविण्‍यात आलेल्‍या आहेत.

नागरिकांनी कुठल्‍याही परिस्थितीत मॅनहोल कव्‍हर न उघडण्‍याविषयी आवाहन करणारे फलक विविध ठिकाणी लावण्‍यात आलेले असून कुठेही उघडे मॅनहोल आढळल्‍यास त्‍वरित महानगरपालिकेला कळविण्‍याबाबत सुचित करण्‍यात आलेले आहे.

Web Title: Do not open the cover over the manhole in a water filled area; Municipal Alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.