दिवाळी काढणार दिवाळं; वीज दरवाढीचा ‘समायोजन’ धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:54 IST2025-10-19T12:54:02+5:302025-10-19T12:54:02+5:30
विद्युत रोषणाईनेही बिलात वाढीची शक्यता

दिवाळी काढणार दिवाळं; वीज दरवाढीचा ‘समायोजन’ धक्का
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सप्टेंबर महिन्यातील वीज वापरानुसार वीज बिलात इंधन समायोजन शुल्क लादण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना वाढीव वीज बिल भरावे लागणार आहे. या शिवाय दिवाळीदरम्यान करण्यात येणाऱ्या रोषणाईमुळेही वीज बिलात वाढ होण्याची शक्यता आहे. हौसेने दिवाळी साजरी केली जाणार असली तरी त्यानंतर पुढील महिन्यांत येणारे वीज बिल वीज ग्राहकांचे खिसेही रिकामे करणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ करत महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश आहेत.
ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ आहे. घरगुती, व्यावसायिक व उद्योग क्षेत्राला हा फटका बसणार आहे. जुलै महिन्यानंतर इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबरमध्ये ही वाढ लागू झाली. विजेची मागणी वाढली. त्यामुळे खुल्या बाजारातून वीज घ्यावी लागली. महाग दराने ही वीज घेतली गेली. शिवाय अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या खर्चाची भरपाई इंधन समायोजन शुल्कातून केली जात आहे.
अशा प्रकारे आकारण्यात येतो दर
नेमके किती रुपयांनी वाढणार विजेचे बिल
१०० युनिटच्या बिलासाठी ३५ रुपये
बिलात इंधन समायोजन शुल्क किती ?
वर्गवारीनुसार आकारणी
एक महिन्यापुरते की पुन्हा आकारणार ?
सप्टेंबर महिन्यातील हा आकार आहे. सप्टेंबर महिन्यातील हा आकार ऑक्टोबरच्या वीजबिलामधून वसूल करण्यासाठी नियाेजन करण्यात आले आहे.
इंधन समायोजन शुल्क कशामुळे ?
विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत वीज खरेदीचे दर महाग होत जातात. या कालावधीत मागणीनुसार वीज पुरवठा करण्यासाठी कधी कधी महाग दराने वीज खरेदी करावी लागते. हा वाढीव खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल केला जातो.
ईव्ही चार्जिंग स्टेशनवरही शुल्क आहे का आणि किती ?
ईव्ही चार्जिंग स्टेशनवर वाहन चार्जनिंगचे प्रतियुनिट ४५ पैसे आकारले जातात.
घरगुती ग्राहकांना कसा फटका बसेल ?
श्रेणी प्रतियुनिट इंधन समायोजन शुल्क बीपीएल १५ पैसे
१ ते १०० युनिट ३५ पैसे
१०१ ते ३०० युनिट ६५ पैसे
३०१ ते ५०० युनिट ८५ पैसे
५०१ पेक्षा अधिक ९५ पैसे