फक्त व्हॉट्सॲप चॅटवर अवलंबून राहून घटस्फोट देता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 05:30 IST2026-03-05T05:30:45+5:302026-03-05T05:30:57+5:30

संबंधित प्रकरणात मे २०२५ मधील आदेशात कुटुंब न्यायालयाने पतीने सादर केलेल्या व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे निर्णय दिला होता.

Divorce cannot be granted based on WhatsApp chat alone; Bombay High Court makes important observation | फक्त व्हॉट्सॲप चॅटवर अवलंबून राहून घटस्फोट देता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

फक्त व्हॉट्सॲप चॅटवर अवलंबून राहून घटस्फोट देता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे आणि जोडीदाराला प्रतिवाद करण्याची संधी न देता क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोटाचा आदेश देता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले, तसेच न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने नाशिक जिल्हा कुटुंब न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा आदेश रद्द ठरवला.

संबंधित प्रकरणात मे २०२५ मधील आदेशात कुटुंब न्यायालयाने पतीने सादर केलेल्या व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे निर्णय दिला होता. त्या चॅटमध्ये पत्नीने पुण्यात वेगळे राहण्याची मागणी केल्याचे, सासू व नणंद यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे नमूद होते. कुटुंब न्यायालयाने या मेसेजवरून पत्नीने दबाव तंत्र वापरल्याचे नमूद करत घटस्फोट मंजूर केला होता.

Web Title : केवल व्हाट्सएप चैट से तलाक नहीं: उच्च न्यायालय का महत्वपूर्ण फैसला

Web Summary : मुंबई उच्च न्यायालय ने कहा, केवल व्हाट्सएप चैट के आधार पर तलाक नहीं दिया जा सकता। दूसरे पक्ष को जवाब का मौका मिलना चाहिए। नासिक के पारिवारिक न्यायालय का आदेश रद्द किया गया, जिसमें चैट के आधार पर तलाक मंजूर किया गया था। बचाव का मौका जरूरी है।

Web Title : Divorce can't be granted solely based on WhatsApp chats: High Court

Web Summary : Mumbai High Court ruled divorce decrees can't rely solely on WhatsApp chats without allowing the other spouse to respond. A Nashik family court's divorce order, based on chat messages, was overturned. The court emphasized the need for fair opportunity to defend against accusations.