Distance of the subway line of Mankhurd Maharashtra Nagar | मानखुर्द महाराष्ट्रनगरच्या भुयारी मार्गाची दुरवस्था
मानखुर्द महाराष्ट्रनगरच्या भुयारी मार्गाची दुरवस्था

मुंबई : सायन-पनवेल मार्गावरून मानखुर्द येथील महाराष्ट्रनगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या भुयारी मार्गात मोठे खड्डे पडले आहेत, तसेच कायम पाणी साठून राहत आहे. भुयारी मार्गातून सायन-पनवेल मार्गाच्या दिशेने बाहेर पडल्यावरदेखील रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे नेमके जायचे कुठून? असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.

रात्रीच्या वेळेस भुयारी मार्गात दिवे नसल्याने अंधार पसरलेला असतो. त्यामुळे समस्येत भरच पडत आहे. पावसाळ्यात या मार्गात पाणी साठल्याने, तसेच खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था होत असते, परंतु पावसाळा संपून समस्या जैसे थे असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रात्रीच्या वेळेस येथे दिवे नसल्याने दुर्घटना होऊ शकते.प्रशासनाने या भुयारी मार्गातील खड्डे बुजवून पाणी साठण्याची समस्या दूर करावी, तसेच येथे दिवे सुरू ठेवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Distance of the subway line of Mankhurd Maharashtra Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.