Join us  

मुख्यमंत्री कार्यालयात अजोय मेहतांच्या नियुक्तीवरुन वाद; काँग्रेस नेत्याने डागली शिवसेनेवर तोफ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 8:35 PM

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देअजोय मेहतांमुळे काँग्रेसचे सर्वच मंत्री नाराज होतेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय म्हणजे काँग्रेसला चिडवण्याचा प्रकार शिवसेनेला काँग्रेसची पर्वा नाही, ही कसली आघाडी?

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीबद्दल पुन्हा एकदा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव सल्लागार म्हणून नेमणूक केल्यावर संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या मुख्य सचिवामुळे काँग्रेसचे सर्वच मंत्री नाराज होते, त्यांची निवृत्तीनंतर मुख्यमंत्री कार्यालयात सल्लागर म्हणून करण्यात आलेली नेमणूक हा निर्णय काँग्रेसला चिडवण्यासारखा आहे. शिवसेनेला काँग्रेसची पर्वा नाही, ही कसली आघाडी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वीही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज्य सरकारच्या कारभारावर तोफ डागली होती. आमचे तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार कोरोनाचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेसने आता हळूहळू या सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री सरकार आपल्या मर्जीने चालवत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने आपला निर्णय घेतला पाहिजे. तसेच सध्या राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्याला शिवसेना जबाबदार आहे. तर मुंबईची वुहान होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे,असं निरुपम यांनी म्हटलं होतं.

जर काँग्रेसने आताच या सरकारपासून योग्य अंतर ठेवले नाही तक पक्षाला जनतेला उत्तरे द्यावी लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्याही सल्ल्याविना मनमानी कारभार करत आहेत. मुंबईवर ओढवलेल्या या परिस्थितीसाठी आमचे सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्राची स्थिती बिघडण्यासाठी सर्वात जास्त शिवसेना जबाबदार आहे. तरीही मुख्यमंत्री अहंकाराने वागत आहेत. हा कुठला अहंकार आहे. त्याचे कारण काय आहे, असा सवालही निरुपम यांनी केला होता. मुख्य सचिव अजोय मेहता यांना पुन्हा मुदतवाढ देण्याला काँग्रेसचा विरोध होता. त्यावर हा विषय ३० जूनला संपून जाईल असं आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आले होते. त्यामुळे निवृत्तीनंतर अजोय मेहतांना मुख्यमंत्री कार्यालयात थेट प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केल्यानं काँग्रेस नाराज आहे का असा प्रश्न संजय निरुपम यांच्या टीकेवरुन समोर येतो

टॅग्स :काँग्रेससंजय निरुपमशिवसेनाउद्धव ठाकरे