Join us  

कोविड १९ च्या कामासाठी नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 7:03 PM

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकार्यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी 

 

मुंबई : कोविड १९ च्या कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना शालेय शिक्षण उपसचिवांच्या निर्देशानुसार तातडीने कार्यमुक्त करावे अशी मागणी भाजपा शिक्षक एमएमआर मधील शिक्षणाधिकाऱ्यांकडे आहेत.  लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांच्या शाळेतील उपस्थितीबाबत सूचना केल्या आहेत. शिक्षकांनी आवश्यकता असल्यास आठवड्यातील २ दिवस शाळेत रहावे तसेच ऑनलाईन लर्निंगच्या  देण्यासाठी शिक्षकांना कोविड  १९ च्या कार्यातून मुक्त करावे अशी सूचना करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या शिक्षकांची नियुक्ती कोविड केंद्रांवर करण्यात आल्या आहेत  कार्यमुक्तीसाठी मागणी करू लागले आहेत. 

याबाबत भाजपा शिक्षक सेल मुंबई विभाग व जनता शिक्षक महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तसेच एमएमआर मधील महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्यांना मेल पाठवून मागणी केली आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका, ठाणे नवी मुंबई कल्याण- डोंबिवली मीरा भाईंदर भिवंडी उल्हासनगर मनपा तसेच एमएमआर क्षेत्रातील अन्य नगरपालिकांनी शिक्षकांच्या सेवा मोठ्या प्रमाणात अधिग्रहित करून विलगिकरण कक्ष तसेच कोविड च्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर जुंपले आहे. 

त्यातच आता शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शिक्षकांना तातडीने स्थानिक प्रशासनाकडून कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :शिक्षककोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसशिक्षण