Disha Salian Case : 'दिशा सालियानचे आई-वडिल दबावाखाली'; किशोरी पेडणेकरांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:00 IST2025-03-21T12:56:01+5:302025-03-21T13:00:21+5:30

Disha Salian Case : दिशा  सालियान मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.

Disha Salian Case Disha Salian's parents are under pressure Kishori Pednekar's big claim | Disha Salian Case : 'दिशा सालियानचे आई-वडिल दबावाखाली'; किशोरी पेडणेकरांचा मोठा दावा

Disha Salian Case : 'दिशा सालियानचे आई-वडिल दबावाखाली'; किशोरी पेडणेकरांचा मोठा दावा

Disha Salian Case ( Marathi News ) : दिशा  सालियान मृत्यू प्रकरणाची आता पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणात सालियान कुटुंबावर दबाव असल्याचा दावा केला आहे. 

सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाही का? म्हणून दुसरा घरोबा केला का?; ठाकरेंचा CM फडणवीसांना टोला

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज 'टीव्ही नाईन' या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, हे प्रकरण कोर्टात आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत, त्या गोष्टी घडल्या आहेत असं त्यांचं म्हणण आहे. या गोष्टीला कोर्टात उत्तर दिले जाईल. या प्रकरणावर पोलीस तपास करतील. मी ज्यावेळी महापौर होते त्यावेळी त्यांचे आई-वडिल मला भेटायला आले होते. ज्यावेळी मी त्यांच्या घरी गेली तेव्हा माझ्यासोबत पोलीस, पत्रकार महिला आयोगाच्या दोन सदस्या होत्या. यावेळी त्यांचे कुटुंब आमच्या मुलीची बदनामी होता कामा नये असं सांगत होतं, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 

"दिशाची आत्महत्या आहे, असं ते म्हणत होते. आम्हाला त्रास होता कामा नये असं त्यांचं मत होतं. आई- वडिल म्हणून पाच वर्षानंतर आलेल्या जागेला पाच वर्षे तपास झाला आहे. तपासावर अविश्वास दाखवता येणार नाही, पाच वर्षानंतर असं काय घडलं. आता दे दबावाखाली आहेत असं वाटत आहे, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला.

Web Title: Disha Salian Case Disha Salian's parents are under pressure Kishori Pednekar's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.