Join us

“आदित्य ठाकरे हे दोन-तीन तास त्या फ्लॅटवर होते”; दिशा सालियन प्रकरणातील वकिलाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:48 IST

Disha Salian Case: या प्रकरणातील आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करावेत. यातील आरोपींची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Disha Salian Case: सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांनी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी मोठा दावा केला आहे. 

काही अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे. त्यानुसार आम्ही काही गोष्टी सादर केल्या आहेत. या सगळ्या गोष्टी यात आहेत. पोलिस जाऊन त्यांच्याकडे जाऊन सिनेमाची स्क्रिप्ट देतात, असे झाले होते, हे झाले होते, तुम्ही कोणाला काही बोलू नका. हे सगळे झाल्यानंतर सांगितले की, केस क्लोज झाली. परंतु जेव्हा यांचे सरकार गेले आणि शिंदे सरकार आले, तेव्हा सप्टेंबर २०२३ मध्ये जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यानंतर शिंदे सरकारमध्ये एसआयटीची घोषणा झाली, अशी माहिती वकील निलेश ओझा यांनी दिली. 

आदित्य ठाकरे हे दोन-तीन तास त्या फ्लॅटवर होते

आदित्य ठाकरे, डिनो मारियो हे दोन ते तीन तास दिशा सालियानच्या फ्लॅटवर होते. अशा काही सिक्रेट बाबी समोर आल्या आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेला तात्काळ अटक होऊ शकते, अटक झाली पाहिजे. आरोपींचा असा दबदबा चालणार नाही. निष्पक्ष कारवाई होऊ शकते, त्या ठिकाणी ही केस ट्रान्सफर करावी. ही आमची मागणी आहे.  आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्याविरोधात सामूहिक बलात्कार, हत्या अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. आरोपीला मृत्यूदंड होईल, हे सुनिश्चित करावे ही आमची प्रमुख मागणी आहे, असे ओझा म्हणाले.

दरम्यान,  याचिकाकर्ते, वकील, साक्षीदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. समीर वानखेडे यांच्याकडे महत्त्वाचा डेटा आहे. त्यांच्या पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. NCB काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ते सर्व मेन्शन केले आहे. त्या डेटामध्ये आहे, असे ते म्हणाले. वकील ओझा टीव्ही९शी बोलत होते. 

 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई हायकोर्टआदित्य ठाकरे