...म्हणून दिशा पटणीला विमानतळावर रोखले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 12:13 IST2023-10-12T12:13:17+5:302023-10-12T12:13:40+5:30
बराचकाळ दिशाने मग आपले सामान तपासले व त्यात तिला तिचे आधार कार्ड सापडले.

...म्हणून दिशा पटणीला विमानतळावर रोखले
मुंबई : चित्रीकरणाकरिता बाहेर जाण्यासाठी बुधवारी सकाळी अभिनेत्री दिशा पटणी मुंबई विमानतळावर पोहोचली खरी, पण बराचकाळ तिला सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वाराच्या बाहेरच अडवून ठेवले होते. दिशा पटणी आणि विमानतळाच्या सुरक्षेसाठी तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षारक्षक (सीआयएसएफ) यांच्यात बराच काळ काहीतरी चर्चा सुरू असल्याचे दिसल्यानंतर स्वाभाविकच तिथे गर्दीही जमली. फोटोही निघाले. पण कारण कळले की, दिशाकडे विमानाचे वैध तिकीट व बोर्डिंग पास असला तरी तिच्या ओळखपत्रासाठी ती आधार कार्ड सादर करू न शकल्यामुळे तिला अधिकाऱ्यांनी थांबविले होते.
- बराचकाळ दिशाने मग आपले सामान तपासले व त्यात तिला तिचे आधार कार्ड सापडले.
- मग ते तिने अधिकाऱ्यांना दाखवले त्यानंतरच तिला विमानतळात प्रवेश देण्यात आला.
- तिथे जमलेल्या गर्दीने तोवर दिशाचे, त्या घटनेचे फोटो काढत सोशल मीडियावर पोस्टही केले. तसेच, या निमित्ताने नेटकऱ्यांनी सुरक्षा रक्षकांनी नियमाची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे त्यांचे भरभरून कौतुकही केले.
- सेलिब्रिटी असो की सामान्य माणूस सर्वांना नियम सारखा, यावर आमचा विश्वास अधोरेखित झाल्याचा आशय या प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे.