हॉटेलमधील जेवण महागणार? एलपीजी दरवाढीचा मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:17 IST2026-04-03T08:17:56+5:302026-04-03T08:17:56+5:30

कधी बंद, कधी मर्यादित वेळेत सेवा, मेन्यूमध्ये बदल आणि पर्यायी स्वयंपाक पद्धतींचा अवलंब यामुळे खर्चात वाढ

Dine out to Get Costlier Restaurants Hint at Price Hike as Operational Costs Jump by 20 percent | हॉटेलमधील जेवण महागणार? एलपीजी दरवाढीचा मोठा फटका

हॉटेलमधील जेवण महागणार? एलपीजी दरवाढीचा मोठा फटका

मुंबई : युद्धाचा थेट परिणाम आता हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसू लागला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीसह एकूण खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाल्याने रेस्टॉरंटमधील पदार्थाच्या किमती वाढण्याचे संकेत 'हॉटेल अॅड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया'ने दिले आहेत.

कधी बंद, कधी मर्यादित वेळेत सेवा, मेन्यूमध्ये बदल आणि पर्यायी स्वयंपाक पद्धतींचा अवलंब यामुळे खर्चात वाढ झाली आहे. त्यातच सरकारने गॅसच्या दरात केलेली वाढ ही 'दुष्काळात तेरावा महिना' ठरली, असे प्रवक्ते प्रदीप शेट्टी यांनी म्हटले आहे.

परिस्थिती अधिक बिकट 

व्यवसायातील उलाढाल घटली असताना खर्च झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मेन्यूचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही. एलपीजी दरवाढीने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. आधीच कमी झालेल्या नफ्यावर अतिरिक्त दबाव आल्याने हॉटेल व्यावसायिकांना दरवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो.
 

Web Title : क्या होटल में खाना महंगा होगा? एलपीजी की कीमतों में वृद्धि का असर।

Web Summary : एलपीजी की बढ़ती कीमतों और समग्र लागतों के कारण रेस्तरां मेनू की कीमतें बढ़ाने पर विचार कर रहे हैं। होटल एसोसिएशन ने परिचालन परिवर्तनों और गैस की कीमतों में वृद्धि से लाभप्रदता पर पड़ने वाले प्रभाव के कारण खर्चों में वृद्धि का हवाला दिया।

Web Title : Restaurant meals to get costlier? LPG price hike hits hard.

Web Summary : Rising LPG prices and overall costs are forcing restaurants to consider increasing menu prices. The hotel association cites increased expenses due to operational changes and gas price hikes impacting profitability.