Dindoshi Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानतंर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुनील प्रभू निकराच्या लढतीत विजयी झाले आहेत. सुनील प्रभू सहा हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांना ७०२५५ मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच मनसेचे उमेदवार भास्कर परब यांना २०३०९ मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील प्रभू यांनी संजय निरुपमांना पराभूत केलं आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या आकेडवारीनुसार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू ६०५८ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ७६४३८ मते मिळाली आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांना ७०२५५ मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. मनसेच्या भास्कर परब यांना २०३०९ मते मिळाली आहेत.
ही जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची जागा ठरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार सुनील प्रभू गेल्या वेळी येथून विजयी झाले होते. यावेळीही ते याच जागेवरून निवडणूक लढवत होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय निरुपम निवडणूक लढवत होते.
दरम्यान, २००९ मध्ये या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राजहंस सिंह निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आणि भाजप-शिवसेना युतीने या भागात आपली पकड मजबूत केली. यावेळी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा सुनील प्रभू हे दिंडोशीमधून निवडून आले आहेत.