Did you give birth to Shravanbal ?, Rane brothers are very angry with Thackeray | यांनी काय श्रावणबाळ जन्माला घातला का?, राणे बंधुंचा ठाकरेंवर तीव्र संताप

यांनी काय श्रावणबाळ जन्माला घातला का?, राणे बंधुंचा ठाकरेंवर तीव्र संताप

ठळक मुद्देउद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखांनी लस घेतलेली दिसते, असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, जीएसटी, बिहार निवडणूक, कोरोना लस, पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंन भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ठाकरेंनी नाव न घेता, राणेंना बेडुकाची उपमा दिली. त्यानंतर, राणे बंधुंनी शिवसेनेवर प्रहार केलाय. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखांनी लस घेतलेली दिसते, असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. "बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी 'Vaccine' घेतलेली दिसते...जास्तच हवा भरलेली आज..किती आव..'टाचणी’ तैयार आहे..फक्त योग्य वेळ येऊन दया...,"असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. तसेच, दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट..
मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का? 
इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया..
मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!, असे ट्विट नितेश राणेंनी केले आहे. 

निलेश राणेंनी दिलं आव्हान

'नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा...,' असं आव्हानच नीलेश राणे यांनी दिलंय.

नारायण राणेंवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले. राज्यात काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Did you give birth to Shravanbal ?, Rane brothers are very angry with Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.