Join us

'अपने'मधील चित्र पाहून खुश झाले धर्मेंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 22:25 IST

२००७मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या 'अपने' या बहुचर्चित हिंदी चित्रपटातील या पेंटिंगमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल आणि बॉबी देओलही आहेत.

मुंबई - 'अँपल मिशन' या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि परोपकारी कार्य करणाऱ्या डॉ. अनिल काशी मुरारका यांनी नुकतीच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची भेट घेतली. यावेळी मुरारका यांनी स्वत: रेखाटलेले चित्र धर्मेंद्र यांना भेट दिले. २००७मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या 'अपने' या बहुचर्चित हिंदी चित्रपटातील या पेंटिंगमध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत सनी देओल आणि बॉबी देओलही आहेत.

मागील १६ वर्षांपासून डॉ. मुरारका चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. धर्मेंद्र यांना भेट म्हणून दिलेले चित्र देओल कुटुंबातील दोन पिढ्यांनी सिनेसृष्टीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे जणू प्रतीकच आहे. धर्मेंद्र यांनी या अनोख्या भेटवस्तूचे आणि भेटीचे कौतुक केले. २३ वर्षांनी 'गदर २'च्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर पुन्हा आपला जलवा दाखवण्यात यशस्वी झालेला सुपरस्टार सनी देओलही यावेळी उपस्थित होता. 'बहोत सुंदर पेंटिंग बनाई हैं आपने', असे म्हणत धर्मेंद्र यांनी मुरारका यांच्या चित्राचे कौतुक केले. एक मानवतावादी व्यक्तिमत्व आणि उत्तम अभिनेते अशी मनोरंजन विश्वात धर्मेंद्र यांची ओळख असल्याची भावना व्यक्त करत मुरारका म्हणाले की, एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले आहेत. पोर्ट्रेट पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांच्या प्रतिक्रियेने खूप प्रभावित झाल्याचेही मुरारका म्हणाले. 

 

टॅग्स :धमेंद्रसनी देओल