Join us

मुंबईतील धर्म व्हीला इमारतीमध्ये आग, अग्निशमनच्या 8 गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 05:40 IST

इमारतीच्या वरील मजल्यावर आगीने पेट घेतला असून स्थानिक नागरिकांनी इमारतीच्या खाली गर्दी केली आहे.

मुंबई - शहरातील भुलाबाई देसाई मार्गावरील धर्म व्हीला इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर, अग्निशमन दलाकडून 8 गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, मध्यरात्री आगीची घटना घडल्यामुळे आग चांगलीच भडकली होती. 

इमारतीच्या वरील मजल्यावर आगीने पेट घेतला असून स्थानिक नागरिकांनी इमारतीच्या खाली गर्दी केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनालाही माहिती देण्यात आली असून तेही घटनास्थळी हजर झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यात आली असून सुदैवाने कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, काही किरकोळ सामान जळाल्याचे समजते.  

 

टॅग्स :आगपोलिसमुंबई