Join us

Dharavi Vidhan Sabha Election Result 2024 : धारावीचा गड गायकवाड कुटुंबाकडेच; ज्योती गायकडवाड २३ हजार मतांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:04 IST

Dharavi Assembly Election 2024 Result : धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचा विजय झाला आहे.

Dharavi Vidhan Sabha Election Result 2024 :धारावी विधानसभा मतदार पुन्हा एकदा गायकडवाड कुटुंबियाकडे आला आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातून डॉ. ज्योती गायकवाड या विजयी झाल्या आहेत. ज्योती गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राजेश खंदारे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता धारावीचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. महाविकास आघाडीने केलेल्या कामगिरीने ज्योती गायकवाड यांनी मोठ्या फरकारने विजय मिळवला आहे.

धारावी विधानसभा मतदारसंघात खासदार वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. ज्योती गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने सुरुवातीला काँग्रेससह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र प्रचार सुरु होताच हा विरोध मावळत गेला. प्रचारामध्ये धारावी पुनर्विकासाचा मुद्दा महाविकास आघाडीने उचलून धरला होता. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात फायदा ज्योती गायकवाड यांना झाला आहे.

१९ व्या फेरी अखेर ज्योती गायकवाड यांना ७०७२७ मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या शिंदे गटाच्या राजेश खंदारे यांना ४७२६८ मते मिळाली आहेत. त्यामुळे धारावीकरांनी पुन्हा एकदा वर्षा गायकवाड यांच्यानंतर ज्योती गायकवाड यांना आपला प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्योती गायकवाड यांनी वर्षा गायकवाड यांच्यापेक्षाही अधिक मतं यावेळी मिळाली आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढल्याने ज्योती गायकवाड यांना धारावी विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतं मिळाली आहेत.

गेल्या निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी शिवसेनेचे आशिष वसंत मोरे यांचा ११८२४ मतांनी पराभव केला होता. आशिष मोरे यांची काँग्रेसच्या वर्षा एकनाथ गायकवाड यांच्याशी थेट लढत होती. काँग्रेसच्या वर्षा एकनाथ यांना एकूण ५३९१५ तर शिवसेनेचे आशिष वसंत मोरे यांना ४२०९३ मते मिळाली होती. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024धारावीमुंबई विधानसभा निवडणूककाँग्रेस