Video: भयंकर! सिलिंडर स्फोटाने धारावी हादरली, १५ मिनिटात अनेक सिलिंडर फुटल्याने अग्निकल्लोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 22:43 IST2025-03-24T22:43:18+5:302025-03-24T22:43:37+5:30
मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धारावीच्या पीएमजीपी परिसरात सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला.

Video: भयंकर! सिलिंडर स्फोटाने धारावी हादरली, १५ मिनिटात अनेक सिलिंडर फुटल्याने अग्निकल्लोळ
मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धारावीच्या पीएमजीपी परिसरात सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. एकाच वेळी अनेक सिलेंडर फुटल्याने आजूबाजूचा परिसर हा दणाणून गेला आहे, महाराष्ट्र निसर्ग उद्यान परिसरात हा ट्रक उभा होता.
कबुतरखाने हटवा, आरोग्य वाचवा! दादरच्या कबुतरखान्याचे लवकरच स्थलांतर
अचानक सुरु लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला. एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत होते. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. जवळपास पंधरा मिनिटे सिलेंडर फुटत होते. त्यामुळे आजूबाजूच्या इमारती आणि झोपडपट्टी मधील रहिवासी यांनी रस्त्यावर धाव घेतली. या घटनेत जिवीतहानी झालेली नाही. धारावीच्या प्रेम नगर परिसरात धारावी बस डेपो समोर कचऱ्याचे डंपर सिलेंडरच्या गाड्या उभ्या केल्या जातात.
सिलिंडरच्या स्फोटामुळे धारावी हादरली; सिलिंडरच्या ट्रकला भीषण आग pic.twitter.com/4FBFBNFCNT
— Lokmat (@lokmat) March 24, 2025
गॅस एजन्सीमध्ये ३५० सिलिंडर फुटले
उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या बिथरी चैनपूर पोलीस स्टेशन परिसरातील राजौ परसापूर येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीमध्ये सोमवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. दुपारी १ वाजताच्या सुमारास सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग लागली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर अनेक मोठे स्फोट झाले. यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. सुमारे एक तास सिलिंडर एकामागून एक स्फोट होत राहिले. स्फोटांसह हवेत उडणाऱ्या सिलिंडरचे तुकडे सुमारे ५०० मीटरच्या परिघात शेतात पडले. तसेच गोदामातून आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. यामुळे राजौ परसापूर गावात घबराट पसरली.
या घटनेत ३५० हून अधिक सिलिंडर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. हे सिलिंडर एका ट्रकमध्ये भरण्यात आले होते. ट्रकचे तुकडे तुकडे झाले. सुदैवाने संपूर्ण गोदामाला आग लागली नाही. नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती.