देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 04:59 IST2020-01-24T04:57:31+5:302020-01-24T04:59:02+5:30

राज्य सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात यावे

Devendra Fadnavis wrote Letter to Chief Minister Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

मुंबई : राज्य सरकारतर्फे प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात सविस्तर दिशानिर्देश दिले आहेत, त्यांच्या अभ्यासानंतर माहिती व जनसंपर्क विभागाने एक परिपत्रक काढले होते. त्यात शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, शासकीय संघटना यांच्या प्रत्येक जाहिरातीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे छायाचित्र असावे, असा स्पष्ट उल्लेख आहे. सध्या ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण’ योजनेंतर्गत हमीभावाने तूर खरेदीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याचा १00 टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे. मात्र त्यानंतरही केवळ मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र प्रकाशित केले जात आहे. निर्देशांचे पालन व्हावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

Web Title: Devendra Fadnavis wrote Letter to Chief Minister Uddhav Thackeray