Ajit Pawar, Devendra Fadnavis Birthday: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 06:24 PM2021-07-22T18:24:37+5:302021-07-22T18:26:17+5:30

Ajit Pawar, Devendra Fadnavis Birthday: राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Devendra Fadnavis thanks ajit pawar for wishing him on birthday | Ajit Pawar, Devendra Fadnavis Birthday: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तेव्हा...

Ajit Pawar, Devendra Fadnavis Birthday: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तेव्हा...

Next

Ajit Pawar, Devendra Fadnavis Birthday: राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांचे आभार व्यक्त करत त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच दिवशी म्हणजे २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. याच योगायोगाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. (Devendra Fadnavis thanks ajit pawar for wishing him on birthday)

राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष सुरू असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेत देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातळमिळवणी करत पहाटे शपथविधी पार पाडला होता. या शपथविधीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार राहिला आहे. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सौदार्हाचे संबंध राहिले आहेत. योगायोग की काय दोघांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी आहे. 

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. "महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!", असं ट्विट अजित पवार यांनी केलं होतं.  

अजित पवारांच्या ट्विटला रिप्लाय देताना देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त करतानाच पवारांना देखील शुभेच्छा दिल्या. "मी आपला आभारी आहे अजित दादा. आपल्याला सुद्धा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना!", असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचेही मानले आभार
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर फडणवीसांनीही उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Devendra Fadnavis thanks ajit pawar for wishing him on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app