धनंजय मुंडे म्हणाले अर्थसंकल्प Copy+Edit+Paste, तर फडणवीस उत्तरले...Ctrl+Alt+Shift
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 14:43 IST2023-03-15T14:42:21+5:302023-03-15T14:43:47+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं.

धनंजय मुंडे म्हणाले अर्थसंकल्प Copy+Edit+Paste, तर फडणवीस उत्तरले...Ctrl+Alt+Shift
मुंबई-
राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीसांनी सादर केलेला अर्थसंकल्प Copy+Edit+Paste असल्याचं म्हटलं होतं. त्यावर फडणवीसांनी आज विधानसभेत उत्तर दिलं. आमचा अर्थसंकल्प कॉपी-एडिट-पेस्ट नव्हे, तर कंट्रोल-अल्टर-शिफ्ट असा अर्थसंकल्प आहे, असं फडणवीस म्हणाले.
"धनंजय मुंडे यांना अर्थसंकल्प कॉपी-एडिट-पेस्ट वाटला. पण मी त्यांना सांगू इच्छितो की हा अर्थसंकल्प कॉपी-एडिट-पेस्ट नाहीय. तर कंट्रोल-अल्टर आणि शिफ्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे", असं फडणवीस म्हणाले.
धनंजय मुंडेंना शायरीतून प्रत्युत्तर
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका करताना शायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं....मज़ा तो तब हैं जब खुशबु आपके किरदार से आये...", असं धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनीही शायरीतून उत्तर दिलं. "दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं", असं फडणवीस म्हणाले.