CoronaVirus News: वारंवार इशारा देऊनही मुंबईकर बेफिकीरच; १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 02:47 AM2021-02-21T02:47:59+5:302021-02-21T06:51:59+5:30

गर्दी न करण्याचे आवाहन, २४ तासांत १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

Despite repeated warnings, Mumbaikars are unconcerned | CoronaVirus News: वारंवार इशारा देऊनही मुंबईकर बेफिकीरच; १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

CoronaVirus News: वारंवार इशारा देऊनही मुंबईकर बेफिकीरच; १३,५९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

Next

मुंबई : कोरोना रुग्णसंख्येत अशीच वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, अशी चेतावनी महापालिका प्रशासन वारंवार देत आहे. मात्र दंड, पोलिसांचा दंडुका आणि जीवाची भीती घालूनही काही मुंबईकरांना अद्याप शहाणपण सुचलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता आपल्या बरोबरच अन्य लोकांचे जीवही धोक्यात घालणाऱ्या तब्बल १३ हजार ५९२ बेफिकीर लोकांवर गेल्या २४ तासांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पालिकेच्या पथकाने २७ लाख १८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला.

लोकल सेवा ठरवीक वेळेत सर्वांसाठी सुरू केल्यानंतर रेल्वेस्थानक व गाड्यांमध्ये गर्दी वाढली. परिणामी, बाधित रुग्णांची दररोजची संख्या एक हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. बहुतांशी लोक मास्क चुकीच्या पद्धतीने अथवा लावतच नसल्याने दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क नाही तर प्रवेश नाही, असा नियम करण्यात आला आहे. मात्र बाजारपेठ, रिक्षा, टॅक्सी, विशेषतः रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रवासी मास्क काढून ठेवत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.

मार्शल, शिक्षक, पोलिसांचे चौफेर लक्ष...
बेफिकीर लोकांना पकडून त्यांना मास्क लावण्याचे आठवण करून देण्यासाठी महापालिकेने मार्शलसह शिक्षक आणि पोलिसांनाही दंड ठोठावण्याचा अधिकार देण्यात आले आहेत.  त्यानुसार ४८ हजार मार्शल सार्वजनिक ठिकाणी, रेल्वेस्थानक व गाड्या चौफेर लक्ष ठेवून आहेत. तोंडावरचे मास्क हनुवटीवरही आणणा-या लोकांवर कारवाई केली जात आहे.

महापाैरांकडून मास्कचे वाटप

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रसार काही विभागांमध्ये वाढत असल्याने, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी सायंकाळी दादर पश्चिमच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ मास्कचे वाटप केले.

 

Web Title: Despite repeated warnings, Mumbaikars are unconcerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.