The designated private doctor is now in the health care of the municipality | नामांकित खासगी डॉक्टर आता पालिकेच्या आरोग्य सेवेत
नामांकित खासगी डॉक्टर आता पालिकेच्या आरोग्य सेवेत

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांत लवकरच मुंबई शहर उपनगरातील नामांकित डॉक्टर रुजू होणार
आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये
सेवा देणारे डॉ. मुफज्जल लकडावाला, डॉ. संजय बोरुडे,
डॉ. नीता वर्ती, डॉ. अमित मायदेव आणि डॉ. सुलतान प्रधान या दिग्गजांना लवकरच पालिकेच्या आरोग्य सेवेशी जोडण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
डॉ. संजय बोरुडे हे बॅरिएट्रीक सर्जन आहेत, तर डॉ. नीता वर्ती रहेजा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. तसेच डॉ. प्रधान प्रिन्स अली खान, ब्रीच कॅण्डी या रुग्णालयात सेवा देतात. तर डॉ. मायदेव पोटविकारतज्ज्ञ म्हणून ग्लोबल रुग्णालयात कार्यरत आहेत.
या डॉक्टरांना केईएम, सायन आणि नायर रुग्णालयांत विविध विभागांमध्ये जोडून घेऊन रुग्णसेवेला बळकटी देण्याचा पालिकेचा विचार आहे. ही संकल्पना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपआयुक्त अश्विनी जोशी यांची आहे.


Web Title:  The designated private doctor is now in the health care of the municipality
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.