Join us

पीडितेवरील हल्ल्याची उपसभापती निलम गोऱ्हेनी घेतली दखल, पोलीस महासंचालकांस पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 14:59 IST

पीडित तरुणीला मनोधैर्य योजनेअंतर्गत तात्काळ मदत आणि आरोपीला तात्काळ पकडण्यासाठी रेल्वे पोलीस विभागास डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

ठळक मुद्देपीडित मुलीवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने अद्यापपर्यंत जबाब घेण्यात आला नाही. तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे सेनगावकर यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले

मुंबई - वाशी रेल्वेच्या पुलावर एक तरुणीला रेल्वेतून खाली फेकून देण्याची घटना दि.२२ डिसेंबर, २०२० रोजी समोर आली आहे. यात पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जबर मारहाण केल्याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून याबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच, पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मदत आणि समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

पीडित मुलीवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने अद्यापपर्यंत जबाब घेण्यात आला नाही. तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे सेनगावकर यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले. सेनगावकर व रेल्वे पोलिसांनी यांनी तत्परतेने केलेली कार्यवाही समाधानकारक आहे.  त्याचप्रमाणे या घटने संदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले. तसेच पीडित तरुणीला मदत मिळण्याबाबत काही सूचना सेनगावकर यांना दिल्या असन पोलीस महासंचालकांना पत्रही पाठविण्यात आले आहे.  

◆ पीडितेला मदत मिळण्याबाबत मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तात्काळ विधी व न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठविण्यात यावा.◆ आरोपींला शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात यावेत. ◆ पिडीत तरुणीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन होण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी. सदरील पीडितेच्या लढयात शिवसेना महिला आघाडी आणि

स्त्री आधार केंद्रच्या कार्यकर्त्या त्यांना न्यायालयीन मदत, सामाजिक स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. उपसभापती कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी डॉ.अर्चना पाटील यांनी देखील घटनेचा तपशील जाणून हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी संवाद साधून डॉ.गोऱ्हे यांच्यावतीने पीडितेच्या तब्येतीची चौकशी केली आहे.

टॅग्स :नीलम गो-हेबलात्कारगुन्हेगारीपोलिस