एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 19:30 IST2025-09-06T19:24:34+5:302025-09-06T19:30:38+5:30

Deputy CM Eknath Shinde Meet Shankaracharya Avimukteshwar Saraswati Maharaj: मराठी माणूस म्हणून आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

deputy cm eknath shinde meet shankaracharya avimukteshwar saraswati maharaj in mumbai | एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”

एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”

Deputy CM Eknath Shinde Meet Shankaracharya Avimukteshwar Saraswati Maharaj: ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात. चातुर्मासाची सुरुवात झाली असून, शंकराचार्य मुंबईत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार असल्याचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले होते. यानंतर आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शं‍कराचार्यांची भेट घेतली.

एक्सवर एक पोस्ट करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चातुर्मासानिमित्त मुंबईत आलेले जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या मुंबई भेटीचे यशस्वी समापन करून पुन्हा द्वारकापीठाला परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी त्यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले, व चातुर्मास उद्यापन मुंबईत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट

गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल माझे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.  महाराष्ट्रातील आपल्या दोन महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आणि आज ते मराठी भाषेतून प्रवचन देतात ही मराठी माणूस म्हणून आपल्यासाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मत याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी या चातुर्मास कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमदार प्रकाश सुर्वे आणि शंकराचार्यांचे असंख्य अनुयायी उपस्थित होते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, जे लोक चांगले काम करतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ताम्र अक्षरात, रौप्य अक्षरात, सुवर्ण अक्षरात नावे लिहितो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणार असून, लवकरच तो ग्रंथ येईल आणि एकनाथ शिंदे यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिलेले सर्वांना पाहता येईल, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले होते. 

 

Web Title: deputy cm eknath shinde meet shankaracharya avimukteshwar saraswati maharaj in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.