"माझ्यात सहन करण्याची ताकद..."; कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:42 IST2025-03-25T10:30:40+5:302025-03-25T10:42:23+5:30

कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde has commented on the Kunal Kamra Controversy | "माझ्यात सहन करण्याची ताकद..."; कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य

"माझ्यात सहन करण्याची ताकद..."; कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य

DCM Eknath Shinde on Kunal Kamra Controversy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाण तयार केल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत सापडला आहे. दोन महिन्यांपूर्वी खार येथील एका क्लबमध्ये कुणाल कामराने ठाणे की रिक्षा असं विडंबनात्मक गाणं गाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराविरोधात रोष व्यक्त केला. कुणाल कामरावर कठोर कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर या सगळ्या वादानंतर रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. हे कोणाची सुपारी घेऊन केलेले आरोप असल्यामुळे मी त्यावर रिॲक्ट झालो नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद राज्यभरात उमटलं. संतप्त शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कुणाल कामरावर कारवाईची मागणी करण्यात आली. कामराने माफी मागायला हवी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिवसभर या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रात्री बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्यात आला. मी विडंबन समजू शकतो पण हे व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष करतो. त्यामुळे मी यासंदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबाबत काय म्हटलंय बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय म्हटलं, लाडकी बहीण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविषयी काय म्हटलंय बघा, पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर भांडला त्यामुळे त्याला दोन तीन एअरलाईन्सनी बाहेर केलं. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. हे कोणाची सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत, त्यामुळे मी यावर रिॲक्ट झालो नाही”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"मी या विषयावर बोलणारच नाही. कारण मी काम करणारा माणूस आहे. माझ्यात सहन करण्याची ताकद आहे. मी कधीही कोणावरही रिॲक्ट होत नाही, मी शांत राहणं, आपलं काम करणं, आपला फोकस कामावर केंद्रित करणं आणि लोकांना न्याय देणं योग्य मानतो," असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

कुठेही लपलेलो नाही, माफी मागणार नाही - कुणाल कामरा

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने भाष्य केलं. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे," असं कुणाल कामराने म्हटलं आहे.

Web Title: Deputy Chief Minister Eknath Shinde has commented on the Kunal Kamra Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.