माहीममधील पाडलेली शाळा पुन्हा उभी राहणार; इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:30 IST2025-09-30T10:30:14+5:302025-09-30T10:30:30+5:30

तीन वर्षांपूर्वी धोकादायक इमारत म्हणून घोषित करून पाडण्यात आलेली माहीमच्या मोरी रोड येथील न्यू माहीम शाळा पुन्हा उभी राहणार आहे.

Demolished school in Mahim to be rebuilt; Tender process begins for reconstruction of building | माहीममधील पाडलेली शाळा पुन्हा उभी राहणार; इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

माहीममधील पाडलेली शाळा पुन्हा उभी राहणार; इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तीन वर्षांपूर्वी धोकादायक इमारत म्हणून घोषित करून पाडण्यात आलेली माहीमच्या मोरी रोड येथील न्यू माहीम शाळा पुन्हा उभी राहणार आहे. या शाळेच्या पुनर्बांधणीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून, पालिकेने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. यासाठी ५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

माहीम, धारावी परिसरातून मोठ्या संख्येने गरीब विद्यार्थी या शाळेत येत होते. या विद्यार्थ्यांसाठी आता आधुनिक, सुरक्षित व सुसज्ज शैक्षणिक वातावरण नवीन इमारतीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तसेच जुनी आणि धोकादायक झालेली शाळेची इमारत पाडून उंच आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज, अशी सुरक्षित इमारत उभारली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पालक आक्रमक
न्यू माहीम शाळेची इमारत पालिकेने धोकादायक घोषित केल्याने पालक संतापले होते. मोरी रोडवरची शाळा न बांधताच दुसरी मराठी शाळाही पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थानिक पालक, मराठी भाषाप्रेमींकडून याला कडाडून विरोध झाला. मोरी रोडची शाळा बांधून पूर्ण करावी आणि त्यानंतर न्यू माहीम एम.एम. छोटानी शाळेची इमारत पुनर्बांधणीसाठी घेण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संस्था, पालक यांच्याकडून होत होती.

‘स्थानिकांना त्रास नको’
पुनर्बांधणीदरम्यान शेजारील इमारती व स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी महापालिकेने कंत्राटदारांना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सेफ्टी नेट्स, बॅरिकेडिंग यांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

१० मजल्यांची नवीन इमारत 
पालिकेच्या आराखड्यानुसार, १० मजली शाळेची इमारत उभारली जाणार आहे. या नव्या आरसीसी रचनेत ३ जिने, ४ लिफ्ट्स, अंडरग्राउंड व ओव्हरहेड टाक्या तसेच सुरक्षा केबिन असेल. शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक्स घालून परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. शाळा परिघाभोवती मजबूत भिंत उभारून दोन प्रवेशद्वारही दिले जाणार आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रणाली बसवली जाणार असून, पावसाचे पाणी साठवण्याची सोय करण्यात येणार आहे.

Web Title : माहीम का स्कूल फिर से बनेगा; पुनर्निर्माण के लिए निविदा प्रक्रिया शुरू

Web Summary : तीन साल पहले ध्वस्त किया गया नई माहीम स्कूल फिर से बनेगा। नगर पालिका ने ₹55 करोड़ की परियोजना के लिए निविदा प्रक्रिया शुरू कर दी है। 10 मंजिला इमारत में आधुनिक सुविधाएं होंगी, जिससे माहीम और धारावी के छात्रों को लाभ होगा। निर्माण के दौरान सुरक्षा उपाय अनिवार्य हैं।

Web Title : Mahim School to Rise Again; Tender Process Starts for Reconstruction

Web Summary : New Mahim School, demolished three years ago, will be rebuilt. The municipality has initiated the tender process for the ₹55 crore project. The 10-story building will have modern amenities, benefiting students from Mahim and Dharavi. Safety measures during construction are mandated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.