पाण्याची मागणी वाढती; पण ते आहे कुठे? गारगाई धरणाच्या बांधकामाची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:24 IST2026-03-21T13:24:03+5:302026-03-21T13:24:22+5:30

मुंबईची पाण्याची मागणी २०४१ साली दैनंदिन ५,६३५ दशलक्ष लिटरवर जाईल. गारगाई आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प पूर्ण झाले, तरी ३५७ दशलक्ष लिटरची तफावत कायमच राहणार आहे. या प्रकल्पांनंतर सध्या तरी कोणताही प्रकल्प दृष्टिक्षेपात नाही. पिंजाळ आणि दमण गंगा हे प्रकल्प अद्याप प्राथमिक स्तरावर आहेत.  

Demand for water is increasing but where is it Waiting for the construction of Gargai Dam | पाण्याची मागणी वाढती; पण ते आहे कुठे? गारगाई धरणाच्या बांधकामाची प्रतीक्षा 

पाण्याची मागणी वाढती; पण ते आहे कुठे? गारगाई धरणाच्या बांधकामाची प्रतीक्षा 

जयंत होवाळ -

मुंबई : मुंबईची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गारगाई धरणाच्या बांधकामाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल, याविषयी अनिश्चितता आहे. 

मुंबईची पाण्याची मागणी २०४१ साली दैनंदिन ५,६३५ दशलक्ष लिटरवर जाईल. गारगाई आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प पूर्ण झाले, तरी ३५७ दशलक्ष लिटरची तफावत कायमच राहणार आहे. या प्रकल्पांनंतर सध्या तरी कोणताही प्रकल्प दृष्टिक्षेपात नाही. पिंजाळ आणि दमण गंगा हे प्रकल्प अद्याप प्राथमिक स्तरावर आहेत.  

२०१४ मध्ये मध्य वैतरणा धरण बांधल्यानंतर गारगाई प्रकल्पाची चर्चा सुरू झाली. सध्या स्थायी समितीपुढे या प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी  मांडण्यात आला आहे. मात्र, सविस्तर तपशील नसल्याने तो मंजूर झालेला नाही. अनेक गावांचे पुनर्वसन, झाडांचे पुनर्रोपण, केंद्र व राज्य स्तरावरील  विविध प्रशासकीय परवानग्या अशी आव्हाने आहेत. 

दैनंदिन पाणीपुरवठा करणारे स्रोत 
तलाव    प्रतिदिन पुरवठा    पुरवठ्यातील 
    (द.ल.लि.)    योगदान (%) 
तुळशी    १८    ०.४३
विहार    ९०    २.१६
वैतरणा    ४५५    १०.९० 
मध्य वैतरणा     ४५५    १०.९० 
तानसा    ५००    ११.९८ 
अप्पर वैतरणा    ६३५    १५.२२ 
भातसा    २०२०    ४८.४१ 

४०० दशलक्ष लिटर पाणी
पाण्याची वाढती गरज पाहता, ‘गारगाई’च्या जोडीला समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पामुळे दररोज ४०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल. पुढील चार वर्षांत प्रकल्प कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. 

पाणीपुरवठ्याचे प्रकल्प 
‘गारगाई’तून ४४० दशलक्ष 
लिटर पाणी दररोज मिळणार असून, हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. २०२० सालच्या अंदाजानुसार अंदाजित खर्च ३,१०५ कोटी आहे. तर, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पातून दररोज ४०० दशलक्ष लिटर मिळणार आहे.

Web Title : पानी की मांग बढ़ी, पर है कहां? गरगाई बांध का इंतजार।

Web Summary : मुंबई की बढ़ती पानी की ज़रूरतें अनिश्चित हैं क्योंकि गरगाई बांध परियोजना मंजूरी का इंतजार कर रही है। योजनाओं के बावजूद, विलवणीकरण के साथ भी पानी की भारी कमी बनी हुई है। चुनौतियों में पुनर्वास और प्रशासनिक मंजूरी शामिल हैं, जिससे परियोजना में देरी हो रही है।

Web Title : Rising water demand, but where is it? Gargaid Dam Awaits.

Web Summary : Mumbai's growing water needs face uncertainty as the Gargaid Dam project awaits approval. Despite plans, a significant water deficit remains, even with desalination. Challenges include resettlement and administrative clearances, delaying the project's completion and impacting future water supply.