पार्सल द्यायचा अन् महिलांचे नंबर सेव्ह करुन अश्लील व्हिडिओ पाठवायचा; मुंबईतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 14:09 IST2023-02-20T14:09:14+5:302023-02-20T14:09:29+5:30

आरोपीला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

Delivering parcels and saving women's numbers to send obscene videos; incident in mumbai | पार्सल द्यायचा अन् महिलांचे नंबर सेव्ह करुन अश्लील व्हिडिओ पाठवायचा; मुंबईतील प्रकार

पार्सल द्यायचा अन् महिलांचे नंबर सेव्ह करुन अश्लील व्हिडिओ पाठवायचा; मुंबईतील प्रकार

मुंबई: महिलांना पॉर्न व्हिडीओ पाठविणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला मालाड पोलिसांनी अटक केली. त्याचे नाव ज्योतिराम बाबूराव मनसुळे (वय २७) असे असून एका ई-कॉमर्स डिलिव्हरी अॅपसाठी तो काम करतो. त्याने अद्याप २० ते २५ महिलांना असे व्हिडीओ पाठविल्याची माहिती आहे.

मालाडमध्ये राहणाऱ्या एका महिलेला अश्लील क्लिप आणि व्हिडीओ कॉल आल्यानंतर तिने गेल्या आठवड्यात मालाड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. मनसुळेने हा अश्लील व्हिडीओ पाठवला आणि त्याचे खासगी व्हिडीओ कॉल करीत प्रदर्शित केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, मनसुळे हा पार्सल देण्यासाठी ज्या महिलांकडे जायचा, त्यांचे मोबाइल नंबर तो सेव्ह करून त्यानंतर त्यांना अश्लील व्हिडीओ क्लिप पाठवायचा. 

पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे आणि पोलिस उपनिरीक्षक धीरज वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू करत पुण्यातून आरोपीला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुणे आणि मुंबईतील २० ते २५ महिलांना फोन करून व्हिडीओ क्लिप पाठवल्याचीही कबुली दिली आहे. शनिवारी त्याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Delivering parcels and saving women's numbers to send obscene videos; incident in mumbai