Delhi Police arrested for smuggling Rs 3.5 crore; Action of the Financial Crimes Branch | साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्याला दिल्लीतून अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्याला दिल्लीतून अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई : एका उद्योजकाला बॅँकेने मंजूर केलेले साडेतीन कोटींचे कर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर हडप करून फरार झालेल्या ठगाला, मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी नवी दिल्ली येथून नुकतीच अटक केली. समीर मनोरंजन दास (वय ४३, रा. गोरेगाव प.) असे त्याचे नाव असून, २००५ पासून तो फरार होता.
बोरीवली (प.) येथे राहात असलेल्या संजय शेट्ये यांनी व्यवसायासाठी एका बॅँकेकडे साडेतीन कोटी रुपये कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यांच्या संपर्कात असलेल्या समीर दासने कोºया धनादेशावर त्यांच्या नावे खोट्या स्वाक्षºया केल्या. त्यांचे पॅन कार्ड व नाव बदली केल्याचे खोटे ‘गॅझेट’ बनविले. त्याच्या आधारे बॅँकेतून परस्पर रक्कम अन्य खात्यात वर्ग केली होती. शेट्ये यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार दिली, तेव्हापासून दास हा फरार झाला होता. दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथील त्याचा फ्लॅट बॅँकेने ताब्यात घेतल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते.
नवी दिल्ली येथील हॉटेल ले तारा मधील रूम नं.२०४ मध्ये तो उतरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरिष्ठ निरीक्षक किशोर परब यांच्या सूचनेनुसार निरीक्षक ज्ञानदेव केदार, सुजीत कुमार पवार आदींच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याला अटक केली. त्याला ट्राझिस्ट रिमांडवर मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

Web Title: Delhi Police arrested for smuggling Rs 3.5 crore; Action of the Financial Crimes Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.