Delhi Election Result: 'दिल्लीत 'आप'चा विजय झाल्यानं नवीन वातावरण निर्माण झालं, हे मान्य नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:25 IST2020-02-11T19:24:24+5:302020-02-11T19:25:06+5:30
ज्या ठिकाणी भाजपा विरोधी सरकार आहे त्या सर्वानी निर्णय घेतला पाहिजे की स्थानिक स्वराज्य निवडणुकीत EVM चा वापर करणार नाही अशी मागणी केली.

Delhi Election Result: 'दिल्लीत 'आप'चा विजय झाल्यानं नवीन वातावरण निर्माण झालं, हे मान्य नाही'
मुंबई - दिल्लीत झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाचा पार धुव्वा उडाला असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली 'आप'पक्षाने एकहाती विजय रथ खेचून आणला आहे. दिल्लीत आपचा विजय झाला, त्यांनी भाजपला हरवून नवीन वातावरण निर्माण केले हे मी मानत नाही असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये पराभव पत्करावा लागला, मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाला, त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपा विरोधी सरकार आहे त्या सर्वानी निर्णय घेतला पाहिजे की स्थानिक स्वराज्य निवडणुकीत EVM चा वापर करणार नाही अशी मागणी केली.
आय लव्ह यू' म्हणत अरविंद केजरीवालांचा 'दिलवाल्या' दिल्लीकरांना 'फ्लाइंग किस'
तसेच दिल्लीतील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचीच सत्ता येणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र दुपार पर्यंत कल हाती येऊ लागल्यावर भाजपा गोटात शांतता पसरू लागली, एक हाती सत्ता घेणाऱ्या आम आदमी पार्टीचे मी अभिनंदन करतो, त्यांनी भाजपाला हरवले, या पुढील निवडणुकांसाठी बॅलेट पेपरचा वापर करावा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी अरविंद केजरीवाल यांना केलं. त्याचसोबत बॅलेट पेपरचा आग्रह करण्यात येईल, जेणे करून निवडणूक आयोगावर दबाव निर्माण होईल, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभेत 'कमळ' फुलवण्याचं भाजपाचं २२ वर्षांपासूनचं स्वप्न पुन्हा एकदा 'आप'च्या 'हवे'त विरलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा आम आदमी पार्टीसाठी 'खास' ठरला असून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः 'झाडू'न टाकलंय. ७० पैकी ६२ जागा 'आप'ने जिंकल्यात आणि दिल्लीत 'तिसरी बार, केजरीवाल सरकार' आणून दाखवलंय.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीचा निकाल हा अपेक्षित होता. मात्र आता आम्ही उर्वरित पक्षांनी एकत्र बसून काम करायला हवे. आज लोकांना एका विचाराच्या अपेक्षा आहे असं सांगतानाच 'भाजप देशावरची ही आपत्ती आहे अशा शब्दात टीका केली. 'या निकालात काहीही आश्चर्य नाही.लोकांनी विकासाला मत दिले आहे. मात्र दिल्लीचा निर्णय हा दिल्लीपुरता नसून हे इतर राज्यांमध्येही होऊ शकते. धार्मिक प्रचाराला ठोकारलं आहे, ही अहंकाराला चपराक आहे. ही प्रक्रिया आता सुरु झाली असून अनेक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे असं त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
पुन्हा एकदा नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना; भाजपा नेत्याने दिली 'छत्रपती' उपमा
किमान शब्दांत कमाल टीका; पुण्यात शरद पवारांकडून राज ठाकरेंचा समाचार
भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला - मनीष सिसोदिया
गोळी मारणाऱ्यांना 'झाडू'ने मारलं, निकालानंतर प्रकाश राजची सिंघम स्टाईल टीका