पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील घरात हरण पडले  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:44 AM2020-05-11T03:44:20+5:302020-05-11T03:44:30+5:30

घटनेची माहिती मिळताच पॉजचे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू हे घटनास्थळी दाखल झाले. शिवाय त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली.

The deer fell into a house in the Hanuman Hill area of Powai | पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील घरात हरण पडले  

पवई येथील हनुमान टेकडी परिसरातील घरात हरण पडले  

Next

मुंबई : पवई येथील रहिवासी सविता सिंग यांच्या घराच्या पत्र्यातून एक हरिण त्यांच्या घरात पडल्याची घटना घडली. येथील स्थानिक रहिवासी आबा कुबल यांनी याची माहिती प्राणिमित्र संघटना पॉजला दिली.
घटनेची माहिती मिळताच पॉजचे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू हे घटनास्थळी दाखल झाले. शिवाय त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे पथक वनपाल रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली येऊन या हरणास पकडले. शिवाय पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व उपचारांसाठी नेण्यात आले. दरम्यान, लगतच्या राष्ट्रीय उद्यानातील प्राणी येथील मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यापूर्वीही येथे टेकडीवरून हरिण पडल्याची घटना घडली होती, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी दिली.

Web Title: The deer fell into a house in the Hanuman Hill area of Powai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.