Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 06:27 IST2025-11-22T06:25:37+5:302025-11-22T06:27:26+5:30
Mangal Prabhat Lodha Death Threat News: मुंबईच्या सुरक्षेसाठी मालाड-मालवणीतील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेतल्याबद्दल स्थानिक काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आपणास संपविण्याची धमकी दिली, असा आरोप राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला.

Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या सुरक्षेसाठी मालाड-मालवणीतील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेतल्याबद्दल स्थानिक काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी आपणास संपविण्याची धमकी दिली, असा आरोप राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. याबाबत पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली. मालवणीमधील कथित रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम सुरू केली आहे त्यामुळे धमकी दिली, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आमदार अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो झाला नाही.
कारवाई सुरूच राहील
मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असताना आ. शेख अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालून सुरक्षेशी खेळत आहेत. घुसखोर आणि अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, असे मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.