Join us

मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सजवळ भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 08:02 IST

महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ एकानं भरधाव कार पादचाऱ्यांना उडवलं आहे.

मुंबई- महालक्ष्मी रेल्वे स्टेशनजवळ एकानं भरधाव कार पादचाऱ्यांना उडवलं आहे. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून, इतर एक वाहनचालक जखमी आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव मर्सिडीजने एका पादचाऱ्याला उडविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या भीषण अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला.या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाला आहे. काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. अंधेरीत राहणारा राजेंद्र प्रसाद राम (४३) याचा या घटनेत मृत्यू झाला. तो ताडदेव येथे नोकरी करत होता. रात्री नेहमीप्रमाणे काम संपवून तो घरी जात होता. त्यावेळी मर्सिडीजने त्याला जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला.

टॅग्स :अपघात