दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 02:58 AM2019-09-04T02:58:04+5:302019-09-04T02:58:27+5:30

कृत्रिम तलावाची व्यवस्था : श्रीगणेशाला निरोप देण्यासाठी वरुणराजाही बरसला

A day and a half goodbye to Father | दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

Next

मुंबई : गणपती बाप्पाचा दीड दिवस पाहुणचार केल्यानंतर मंगळवारी भक्तांनी त्यास निरोप दिला. मायानगरीत ‘निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...’ असे म्हणत बाप्पाला निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले होते. भक्तिमय वातावरणात मुंबापुरीतल्या गिरगाव, दादर, जुहू आणि वेसावे या प्रमुख चौपाट्यांसह कृत्रिम व नैसर्गिक तलावांत भक्तांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात दुपारपासूनच सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकांनी मुंबापुरीचा आसमंत दुमदुमून गेला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाई थिरकली. टाळ आणि मृदुंगाच्या तालावर भजने रंगू लागली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या...’ अशा जयघोषात सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गणपती विसर्जनावेळी पावसाच्या जोरदार हजेरीत गणेशभक्तांनी ओलेचिंब भिजून निरोप दिला.

दहिसर येथील कांदरपाडा, एक्सर, शिंपोली, कांदिवली गाव तलाव, भुजले तलाव, आरे कॉलनी, बांगुरनगर (गोरेगाव), श्यामनगर तलाव, बाणगंगा तलाव, शीव तलाव, चरई तलाव, शीतल तलाव, पवई तलाव, नाहूर तलाव (कांजूर), शिवाजी तलाव (भांडुप) इत्यादी तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गोराई, मार्वे खाडी (मालाड), आक्सा, वेसावे किनारा, जुहू चौपाटी, बॅण्ड स्टॅण्ड, खारदांडा (कोळीवाडा), दादर चौपाटी, प्रभादेवी, वरळी कोळीवाडा, वरळी चौपाटी, गिरगाव चौपाटी इत्यादी किनाऱ्यांवर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गर्दी झाली होती.

मंगळवारी सायंकाळी
६ वाजेपर्यंत नैसर्गिक
स्थळी विसर्जित मूर्ती
च्घरगुती : ९ हजार ७७
च्सार्वजनिक : २०
कृत्रिम तलावांत
विसर्जित मूर्ती
च्घरगुती : २,३३८
च्सार्वजनिक : ३

नॅशनल पार्कात बाप्पाचे विसर्जन
च्बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आवारातील नव्या पार्किंग क्षेत्रात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या तलावात सायंकाळपर्यंत ३४० गणपतींचे विसर्जन झाले.
च्कृत्रिम तलावामुळे दहिसर नदीमध्ये विसर्जन करणे बंद झाले आहे. त्यामुळे नदीचे संवर्धन होते आहे. कृत्रिम तलावात नदीचे पाणी ठेवण्यात आले असून, भाविकही सकारात्मक आहेत.
च्पूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन किलोमीटर अंतरावर कृत्रिम तलाव उभारण्यात येत होते. त्या वेळी वाहनांची वर्दळ, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट इत्यादी गोष्टींमुळे वन्य जीवांना त्रास होत असे. तो यंदा कमी झाला आहे, अशी माहिती रिव्हर मार्चचे सदस्य विक्रम चोगले यांनी दिली.

Web Title: A day and a half goodbye to Father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.