Join us
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या आईच्या दोन मालमत्तांचा २ कोटींना लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 06:48 IST

मुंबके या गावात दाऊदच्या कुटुंबाच्या मालकीचे चार भूखंड आहेत. त्यांच्या लिलावाची घोषणा करण्यात आली होती.

मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याच्या आईच्या नावे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दोन भूखंडांचा लिलाव २ कोटी ४ लाख २८ हजार रुपयांना झाला आहे. स्मगलर्स अँड फॉरेन एक्सेंज मॅनिप्युलेटर्स या कायद्याअंतर्गत ही लिलावाची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. 

मुंबके या गावात दाऊदच्या कुटुंबाच्या मालकीचे चार भूखंड आहेत. त्यांच्या लिलावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, यापैकी केवळ दोन भूखंडांकरिता एकूण सात जणांनी अर्ज केला होता. तर, अन्य दोन भूखंडाकरिता अर्ज आला नव्हता.  

टॅग्स :दाऊद इब्राहिमरत्नागिरी