Join us  

सांगली आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 2:12 PM

राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

मुंबई - राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या महानगरपालिकांचे मतदान 1 ऑगस्ट रोजी होणार असून, 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. त्याबरोबरच वसई-विरार महानगरपालिकेतील रिक्त पदांसाठीही 1 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 4 जुलै ते  11 जुलैरोजी दुपारी 2 वाजेपर्यंत दाखल करता येतील. - 12 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. -17 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. - 18 जुलै रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल.-18 जुलै रोजी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित कऱण्यात येईल.- 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान होईल. - 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.

टॅग्स :निवडणूकसांगलीजळगावमहाराष्ट्र