Join us

दापोली रिसॉर्ट प्रकरण: सदानंद कदमांना दिलासा नाहीच, हायकोर्टाने जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:24 IST

अनिल परब यांना रत्नागिरीत जागा घ्यायची होती आणि त्यासाठी २०१७ मध्ये त्यांनी कदम यांच्याशी संपर्क साधला. 

मुंबई : ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात शिवसेनेचे उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांचा जामीन अर्ज बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळला. न्या. मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने कदम यांना दिलासा देण्यास नकार दिला. रत्नागिरी येथील दापोलीमध्ये उभारण्यात आलेल्या साई रिसॉर्टशी संबंधित झालेल्या पैशाच्या अफरातफरीबाबत ईडी चौकशी करत असताना त्यात कदम यांचे नाव पुढे आले. मार्च मध्ये ईडीने कदम यांना अटक केली. 

अनिल परब यांना रत्नागिरीत जागा घ्यायची होती आणि त्यासाठी २०१७ मध्ये त्यांनी कदम यांच्याशी संपर्क साधला. ऑक्टोबरमध्ये विशेष पीएमएलए न्यायालयाने कदम यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.  मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीउद्धव ठाकरेउच्च न्यायालय