Join us

दहिसर ते मीरा-भार्इंदर अन् अंधेरी-विमानतळ मेट्रोस मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 06:42 IST

दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.

मुंबई : दहिसर ते मीरा-भार्इंदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा दोन मेट्रो मार्ग प्रकल्पांची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.या दोन्ही मार्गांची एकूण लांबी १३.५८ किमी असून त्यासाठी सुमारे ६ हजार ६०७कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील दहिसर-मीरा भार्इंदर हा मेट्रो मार्ग क्रमांक ९ एकूण १०.४१ किलोमीटर लांबीचा असून पूर्णत: उन्नत स्वरुपाचा आहे. मेट्रो मार्ग ७ अ म्हणजे अंधेरी ते विमानतळ हा एकूण ३.१७ किलोमीटर लांबीचा असून यामध्ये ०.९८ किमी उन्नत तर २.१९ किमी अंतराच्या भुयारी मार्गिका असतील. या प्रकल्पांमध्ये १० उन्नत तर एक भुयारी अशी एकूण ११ स्थानके असतील.शासकीय जमीन नाममात्र दरानेया प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून १ हजार ६३१ कोटी रुपये बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच एमएमआरडीए वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणी करेल. प्रकल्पासाठी लागणारी शासकीय, निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांची जमीन ही नाममात्र दराने दिली जाणार आहे.>३ किलोमीटर अंतरासाठी १० रुपये भाडेया प्रकल्पासाठी सुरुवातीचे भाडेदर ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी १० रुपये, ३ ते १२ किमीसाठी २० रुपये, १२ ते १८ किमीसाठी ३० रुपये, १८ ते २४ किमीसाठी ४० रुपये, २४ ते ३० किमीसाठी ५० रुपये, ३० ते ३६ किमीसाठी ६० रुपये, ३६ ते ४२ किमीसाठी ७० रुपये आणि ४२ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी ८० रुपये असे असतील. मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या या मागार्मुळे प्रवासाच्या कालावधीमध्ये ३० ते ४० मिनिटांची बचत होणार आहे. हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी ८ लाख ४७ हजार प्रवासी या मार्गाचा प्रतिदिन वापर करतील. २०३१ पर्यंत ही संख्या ११ लाख होईल, असा अंदाज आहे.>मेट्रो-३ च्या मार्गावर धावणार ३१ गाड्यादक्षिण मुंबईतील कफ परेड आणि उत्तर मध्य मुंबईतील ‘सिप्झ’ यांना जोडणाºया मुंबई मेट्रोच्या क्रमांक ३ च्या मार्गावर (मेट्रो-३) चालविण्यासाठी प्रत्येकी आठ डब्यांच्या ३१ अत्याधुनिक गाड्या पुरविण्याचे कंत्राट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अल्स्टॉम या कंपनीस दिले आहे. हे कंत्राट सुमारे ३१५ दशलक्ष युरो (सुमारे २,६४६ कोटी रु.) एवढ्या खर्चाचे आहे. अल्स्टॉम कंपनीस हे कंत्राट ‘मेक इन इंडिया’ योजनेखाली देण्यात आले असून कंपनी मुंर्ब मेट्रोसाठीच्या या गाड्यांचे उत्पादन त्यांच्या चेन्नईजवळील श्री सिटी येथील कारखान्यात करेल. या गाड्यांमध्ये चटकन वेग पकडण्याचे व तेवढ्याच जलद गतीने तो कमी करण्याचे विशेष तंत्रज्ञान असेल.

टॅग्स :मेट्रो